ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी, मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं काही सांगता येणार नाही, असे विधान केले. या एका वाक्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परभणीतील…