फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, विदर्भ- मराठवाड्यात उद्योगक्रांती:राज्यात उभारले जाणार ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशाल प्रकल्प; हजारो तरुणांना रोजगार
राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹89,731 कोटींच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला…