जनतेसाठी लढणार; सुधाकर भारसाकळे शिंदेसेनेत जाणार, काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी
अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेतृत्व तसेच काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील माहेश्वरी भवन येथे संवाद मेळाव् . काही दिवसांपूर्वीच त्यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण…