Headlines

विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश:आषाढी वारीकाळात गॅस,इंधन टंचाई भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाणार‎



श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वारचे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्ति

.

. इंधन पुरवठा: सोलापूर जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅसची टंचाई नसून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. आषाढी वारी कालावधीत देखील टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. . पालखी मार्ग व आरोग्य: आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावर ज्यादा जर्मनी हँगरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. भाविकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी टू व्हीलर ॲम्बुलन्सची संख्या वाढविण्यात येणार . . अतिक्रमण व विक्रेते: शहरातील अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावीत. तसेच अतिक्रमण होणार नाही याबाबत कायमस्वरूपी नियोजन करावे. मंदिर परिसरात फिरत्या विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी. . सुरक्षा अन् अन्न तपासणी: नगरपालिकेने नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत. खाद्यपदार्थांच्या दुकानांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून ज्यादा पथके नेमण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदी पात्रातील होडी चालकांना भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी लाईफ जॅकेट देण्यात येणार आहेत.

प्रांताधिकारी यांनी दररोज सीसीटीव्हीची पाहणी करावी व यामध्ये दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. दर्शन रांग व मंदिर परिसरात आरोग्य सुविधा केंद्र वाढविण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत दर्शनी मंडपाचे काम सुरू आहे.

जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले की, अधिक मासातील एकादशीनिमित्त मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेत भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांती कक्ष, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, शौचालय, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *