जि.प.च्या सर्वच मतदारसंघासाठी तयारी करून ठेवा- सरनाईक:शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीनंतर प्रथमच मेळावा
आगामी जिल्हा परिषदेसह अन्य निवडणुका शिवसेना (शिंदे गट) युती म्हणूनच लढणार आहे; मात्र सर्वच मतदारसंघांसाठी तयारी करून ठेवा, असे म्हणत पक्षाचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे संकेत दिले. ते सोमवारी मतदार विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बीएलए (बूथ लेव्हल एजंट) प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. मेळावा गोरक्षण…