Headlines

अचलपुरच्या दोनोडा शाळेत सुरु होणार सहावी, सातवीचा वर्ग:विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश, सुमारे 30 विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित‎

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्गदेखील सुरू होणार आहेत. इमारत पुरेशी नसल्यामुळे हे वर्ग गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटरची पायपीट करून आसेगाव पूर्णा येथे जावे लागत होते. ही पायपीट थांबविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणाचा आज अंतिम फैसला:राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज, 25 जून रोजी जाहीर होणार आहे. हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालय आपला अंतिम फैसला सुनावणार…

Read More

महान परिसरात ढगफुटीसदृश पाऊस:कपाशीचे पीक खरडले, जिल्ह्यातील शेतीशिवारात साचले पाणी; बळीराजा सुखावला

गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि. २४ जून) दुपारी जिल्ह्यातील अकोला, कुरणखेड, महान, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. महान परिसरात रात्रीसह बुधवारी सकाळपासून पाऊस : दुसरीकडे, महान आणि परिसरात तब्बल १७ दिवसांच्या…

Read More

अहमदाबाद विमानतळावर दोन विमाने समोरासमोर आली:धडक टळली, 200 मीटर अंतर राहिले होते; एअर इंडियाच्या विमानाने चुकीचे वळण घेतले होते

अहमदाबाद विमानतळावर बुधवारी संध्याकाळी एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवे (धावपट्टीचा एक भाग) वर समोरासमोर आली. मात्र, दोन्ही विमानांना वेळेत थांबवण्यात आले. सूत्रांनुसार, मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान, मुंबईहून अहमदाबादला आलेले एअर इंडियाचे विमान पार्किंग बेकडे जात असताना चुकून चुकीचे वळण घेऊन त्याच…

Read More

वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी‎

वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी जवळील मोठ्या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली आहे. ही उघड्यावर साठवलेली राख आता परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे.सध्या सुरू असलेल्या रखरखत्या…

Read More

करिश्मा कपूर@52, जया बच्चन यांनी जाहीरपणे सून म्हटले:कपूर घराण्याची पहिली अभिनेत्री, हनिमूनवर पतीने मित्रांसोबत झोपायला सांगितले

90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या करिश्मा कपूर आज 52 वर्षांच्या झाल्या आहेत. 65 हून अधिक चित्रपट आणि असंख्य हिट्सच्या जोरावर सुपरस्टार बनलेल्या करिश्माला कपूर घराण्याची परंपरा बदलण्याचे श्रेयही दिले जाते. त्यांच्या आधी कपूर घराण्यातील महिलांना चित्रपटांशी जोडले जाण्यावर बंदी होती. करिश्माची कहाणी केवळ स्टारडमची नाही, तर अपूर्ण नातेसंबंध आणि वादांचीही आहे. एकेकाळी अक्षय खन्नाला…

Read More

दिवसभरात 32.7 मि.मी. नोंद; रविवारपर्यंत बरसण्याची शक्यता:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह बरसला मुसळधार पाऊस‎

जिल्ह्यात गत २४ तासात ३२.७ अंश सेल्सिअस पाऊस पडल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कुरणखेडसह अन्य काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचले. दरम्यान जिल्ह्यात २८ जूनपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २४ जून रोजी वर्तवली. ही परिस्थिती पेरणीसाठी पोषक असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे….

Read More

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव वैद्य, विलासराव देशमुख…

Read More

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे…

Read More

वैरागमध्ये ठाकरे गटाचे ‘जोडे मारो आंदोलन':शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गद्दार खासदारांच्या निषेधार्थ “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफीचा शासन निर्णय (जीआर) तातडीने…

Read More