महापौरांना मुंबईपेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस:मॅनहोल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा भाजप आणि रितू तावडेंवर कडाडून हल्ला
मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “सध्याच्या महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय…