पायरेटेड सॉफ्टवेअरद्वारे महाराष्ट्र सरकारचे कोट्यवधींचे व्यवहार:‘कॅग’च्या अहवालातून खुलासा, राज्य सरकारच्या तिजोरीवर सायबर हल्ला होण्याचा धोका
राज्य सरकारच्या तिजोरीची सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार सध्या वाऱ्यावर आहेत. कार्यालयांच्या संगणकातील ‘पायरेटेड सॉफ्टवेअर’मधून कोट्यवधींचे व्यवहार सुरू आहेत. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅग-२०२६ च्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या संगणकांवर अनधिकृत सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे अन् पेन ड्राइव्हच्या वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळेच सायबर चोरांना मोकळे रान मिळते. सरकारी तिजोरीलाही सायबर…