Headlines

अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक‎

शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा…

Read More

विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा निषेध:पैठणमध्ये काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सतीश पेंडसे यांना सुपूर्द करण्यात आले. हे आंदोलन तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश मुळे व शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या संयुक्त…

Read More

प्राणघातक हल्ला:सिल्लोड शहरात घरात घुसून जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

सिल्लोड कौटुंबिक वादातून व संशयाच्या भरात सासरच्या घरात घुसून जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या हल्ल्यात पत्नी व सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयभवानीनगर येथील समरीन खालेक पटेल (२२) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील आरेफ सत्तार पटेल…

Read More

नागद येथील आरोग्य शिबिरामध्ये 1220 रुग्णांवर केले मोफत उपचार:रक्तदान शिबिरासही प्रतिसाद

कोरोना काळाने मानवी आयुष्याचे आणि आरोग्याचे खरे मूल्य सर्वांना पटवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सामाजिक दातृत्वाची भावना जपून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केले. नागद येथे महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या शिबिरात १२२० रुग्णांची…

Read More

गौताळ्याच्या खांडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू:माळीवडगाव येथील शाळेकडे जाताना अपघात, 1 महिन्यापूर्वीच झाले रुजू

कन्नड-नागद रस्त्यावरील गौताळा अभयारण्यातील गौताळा खांडी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कला शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. समाधान रतन सोनवणे (३३, रा. चिमणापूर, ता. कन्नड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सोनवणे हे महिनाभरापूर्वीच गंगापूर तालुक्यातील माळीवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अंशकालीन कला शिक्षक म्हणून मानधनावर रुजू झाले…

Read More

पार्थ, कायनात यांचा विवाह पुढील वर्षी 27 फेब्रुवारीला:धार्मिक प्रथांबाबत शंकराचार्यांकडून मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार असून त्यांचा साखरपुडा २९ जुलै २०२६ रोजी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट…

Read More

बडोदा बँकेने 80 लाखांची ‘एफडी’ परस्पर काढली:8% व्याजासह रक्कम परत द्या, स्थायी लोकअदालतीचे आदेश

ग्राहकांच्या बनावट सह्यांवरून परस्पर तब्बल ७९ लाख ९६ हजार २६ रुपयांचे १२ फिक्स डिपॉझिट आणि चेकद्वारे पैसे वळवून बँकेने ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास दिला. या प्रकरणी स्थायी लोक अदालताने बँक ऑफ बडोदाचा हा निष्काळजीपणा ही ‘सेवा त्रुटी’ ठरवत, बँकेला ग्राहकाची संपूर्ण रक्कम ८ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका काय आहे प्रकार?…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:जिल्हा परिषदेत निविदा न मागवता 40 लाख रुपयांची फर्निचर खरेदी, अध्यक्षांच्या मर्जीतील ठेकेदारासाठी प्रशासनाकडून उधळपट्टी

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ३ सभापतींच्या दालनासाठी कोणतीही निविदा न मागवता थेट सुमारे ४० लाख रुपयांचे फर्निचर घेतले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांने फर्निचर खरेदीची जबाबदारी स्वीकारली नाही.शासकीय निधीतून खर्च करायचा असल्यास . विशेष म्हणजे, शहरात फर्निचरची अनेक दुकाने असतानाही गंगापूर येथील फर्निचर मॉल येथून साहित्य खरेदी केले आहे. याविषयी अतिरिक्त मुख्य कार्यकारी…

Read More

फोटो व्हायरलची धमकी देत महिलेचे घाटीतून अपहरण:पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अत्याचार, संभाजीनगरातील घटना; बदनापूरातील पीडिता

मावस भावाला भेटण्यासाठी घाटीत आलेल्या ३५ वर्षांच्या ऊसतोड मजूर महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इन्स्टाग्रामवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हे अपहरण करण्यात आले. १५ ते १७ जुलै दरम्यान नेवासा येथे हा प्रकार घडला. प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजू म्हसू माळी (२७, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे….

Read More

आज CJP-सरकारमध्ये चर्चेची तिसरी फेरी:प्रधानांच्या राजीनाम्यावर मिळणार उत्तर; आंदोलनाचा परिणाम- दिल्लीत दारू दुकाने लवकर बंद होणार

नीट पेपरफुटीतील गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात शुक्रवारी दुसऱ्या फेरीची चर्चा झाली. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, CJP ने 3 मागण्या आणि परीक्षा सुधारणांसाठी 5 सूचना मांडल्या आहेत. सरकार यावर चर्चा करत आहे. आज शनिवारी दुपारी 3.30 वाजता तिसऱ्या फेरीची बैठक होईल. ज्यात सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आपली…

Read More