12 गावांना सिंचन योजनेतून पाणी मिळणार:शासनाची मंजुरी, प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्याला यश
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या १२ कोरडवाहू गावांना दिलासा मिळाला आहे. या गावांकरिता स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा (बु.), शिवणगावसह एकूण १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांनी या…