कर्जमाफी यादीत घोळ; तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष:तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन, माफ केलेल्या रकमेत तफावत
राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत प्रचंड तफावत असल्याचे समोर आले असून, एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध रास्त…