विंचूरजवळ 18 लाखांचा अनुदानित युरिया जप्त:कृषी विभाग व पोलिस कारवाई; दोघांवर गुन्हा
निफाड तालुक्यातील विंचूरजवळील विष्णूनगर येथे अनुदानित युरियाच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७२८ गोण्या अनुदानित युरिया किंमत अंदाजे १८ लाख २० हजार तर दोन ट्रक किंमत सुमारे ७५ लाख असा एकूण सुमारे ९३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू…