Headlines

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी समन्वयाने हटवणार अतिक्रमणे:जामखेडच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट; बैठकीत निर्णय‎



गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा निर्णय महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभाग,

.

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक सहकार्य करणार असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी म्हणाले, रस्त्याचे अंतर व रुंदी शासनाच्या नियमानुसार निश्चित करण्यात यावी. नगरपरिषदेकडून होत असलेल्या विकासकामांना आम्ही सर्व समाजबांधवांचा पूर्ण पाठिंबा असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम पाठीशी राहू. यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्यानंतर काही जणांनी त्या नोटिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्याने उच्च न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढत दहा याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीस उपविभागीय प्रांताधिकारी नितीन पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, तहसीलदार धनंजय बांगर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, आंदोलनकर्ते अवधूत पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल उगले, अमित चिंतामणी, नगरसेवक पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, विकी घायतडक उपस्थित होते. बैठकीतील निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीच्या कामाला आता गती मिळणार आहे.

प्रशासनाने निर्णयाची अंमलबजावणी करावी ^ बैठकीत शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार हटविण्याचा निर्णय घेण्यात आला, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमण हटवून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीचे रखडलेले काम सुरू होईपर्यंत संघर्ष कायम राहणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून जनतेला दिलासा द्यावा.” अवधूत पवार, आंदोलनकर्ते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *