![]()
सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळे येथील ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न सांगण्याची तसेच बनावट कर्ज अॅप्स आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःसह कुटुंबीय व मित्रपरिवाराला सतर्क ठेवण्याची सायबर सुरक्षा शपथ दिली. शपथेमध्ये मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके फाईलवर क्लिक करणार नाही, माझा ओटीपी कोणालाही सांगणार नाही, सायबर फसवणुकीपासून स्वतः आणि इतरांना सावध करेन तसेच कोणताही सायबर गुन्हा आढळल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देईन,” असा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. या कार्यक्रमास आळेफाटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,संस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षिततेची शपथ विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न सांगण्याची तसेच बनावट कर्ज अॅप्स आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःसह कुटुंबीय व मित्रपरिवाराला सतर्क ठेवण्याची सायबर सुरक्षा शपथ दिली.
Source link
विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ!:सायबर जनजागृतीसाठी पोलिसांनी राबवला अनोखा उपक्रम