पावसाचा फटका:आठ तालुक्यातील 57 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, विक्रमी 40 मंडळांत अतिवृष्टींची झाली नोंद
अमरावती जिल्ह्यात ३० ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांमुळे बसलेला फटका ताजाच असताना आता अतिपावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ४१९ गावांतील ५७ हजार…