![]()
शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व. शंकरलाल खंडेलवाल उपाख्य काकाजींची जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगी
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक धनंजय बापट, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्यासह मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते. समर्पण, जिव्हाळा, कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्व. काकाजी खंडेलवाल यांनी केलेले कार्य सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रेरणास्रोत म्हणून प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमात प्रिती इंगळे, निकिता पोरे, साक्षी पुसदकर यांनी मनोगत व्यक्त केले. ना. आकाश फुंडकर यांनी मनोगतात स्व. शंकरलालजी खंडेलवाल यांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवाकार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात डॉ. हातवळणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. जगदीश साबू यांनी केले. प्रेरणा गीत कविता वरघट यांनी सादर केले. सूत्रसंचालन डॉ. डिंपल मापारी, डॉ. निलिमा सरप यांनी केले. आभार डॉ. प्रसन्न पांडे यांनी मानले. नरकेसरी प्रकाशन, नागपूर संस्थेला “स्व. काकाजी स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएम उषा योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या लिफ्ट व मीटिंग रूमचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात शंकरलाल खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्व. काकाजी स्मृती पुरस्कार व मानपत्र, पन्नास हजार रुपये व सन्मानपत्र धनंजय बापट, नरकेसरी प्रकाशन, नागपूर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. निशिकांत देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमात गुणवत्ता यादी, विशेष प्राविण्यप्राप्त, नैपुण्यप्राप्त, कलरकोटप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यात स्नेहा खंडारे, कृतिका शेलकर, भक्ती वाघोडे, नेहा तायडे, अनुराधा शिरसाट, खुशी वेले, अर्चना यादव, प्रियंका शिंदे, सलोनी तिहिले, वैशाली जाधव, खुशी पुसदकर, समीक्षा आसरे, कोमल महल्ले, श्रुती मुळे, हर्षा निंबेकर, साक्षी पुसदकर, संस्कार धानोरकर, आदींचा समावेश होता.
पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएम उषा योजनेंतर्गत बनवलेल्या रुमचे उद्घाटन