Headlines

वंचित, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना ‎अण्णाभाऊंनी फोडली वाचा‎:पंढरपुरात अभिवादनावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांचे प्रतिपादन




साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके म्हणाल्या, “लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून, लोककलेतून आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून, सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये जपण्यासाठी त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. या कार्यक्रमास नगरसेवक सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, किरण घाडगे, विनायक देवमारे, प्रसाद कळसे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *