Headlines

आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर आदेश देणार का?:आंदोलन केल्याशिवाय सरकार वटणीवर येत नाही, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा एल्गार

मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

पुण्यात बॉम्ब ठेवणारा राठोड कवठेचा:भिशीतून गावकऱ्यांनाही लाखोंचा गंडा, आई-भावासोबत राहायचा पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये

पुण्याच्या हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात ‘आयईडी’ (बॉम्बसदृष्य वस्तू) ठेवणाऱ्या संशयित आरोपीच्या पुणे पोलिसांनी शुक्रवारी नागपुरात मुसक्या आवळल्या. शिवाजी राम राठोड हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील कवठे तांडा (ता. उत्तर सोलापूर) गावचा. इथेही त्याने अनेक कारनामे केले. भिशीच्या नावाखाली कवठे तांडा परिसरातील अनेक गावकऱ्यांना 10 ते 15 लाख रुपयांचा गंडा घालून तो सात महिन्यापूर्वी तो पुण्याला…

Read More

हिंगोलीत मोबाईलवरून वडिलांनी टोकले:16 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, बिबथर गावावर शोककळा

कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे एका सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर शनिवारी ता. 16 सकाळी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे किरकोळ कारणावरून राग आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबथर येथे गोविंद शिंदे…

Read More

प्राप्तिकर वसुलीसाठी आता ‘AI’ चा वॉच!:नव्या कायद्यात चॅटबॉट देणार करदात्यांना माहिती; पुण्यात 'प्रारंभ 2026' संपन्न

प्राप्तिकर वसुलीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाणार असून, चॅटबॉटद्वारे करदात्यांना सर्व माहिती उपलब्ध होईल. प्राप्तिकर 2025 हा नवा कायदा अधिक सुस्पष्ट आणि सोप्या भाषेत तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यात ‘प्रारंभ2026’ या पहिल्या लोकाभिमुख कार्यक्रमात प्रधान आयुक्त विवेक वाडेकर यांनी ही माहिती दिली. पुणे शहरातील गणेशखिंड येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात प्राप्तिकर विभागातर्फे…

Read More

रितेशला लोकांनी अभिनेता नाही, मुख्यमंत्र्यांचा मुलगा मानले:चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा अभिनय सोडायचा होता; कॉमेडीमुळे ओळख मिळाली, व्हिलन बनून चकित केले

कॉमेडी चित्रपटांमुळे ओळख निर्माण करणारे रितेश देशमुख आज ‘राजा शिवाजी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे आणि ट्रोलिंगमुळे त्रस्त होऊन त्यांनी अभिनय सोडण्याचा विचार केला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र असल्यामुळे लोक त्यांना अनेकदा अभिनेता नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणत असत. ‘तुझे मेरी…

Read More

तटकरे पोहोचण्याआधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर उपस्थित होते:राष्ट्रवादीच्या राजकारणात सस्पेन्स; मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन वरिष्ठ नेत्यांना संघटनेत दुय्यम स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव मागे…

Read More

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून पिंपरी-चिंचवडमध्ये मॉलवर फायरिंग:फेसबुक पोस्टनंतर पुण्यात खळबळ; थेट जीवे मारण्याची धमकी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध ‘एजे फर्निचर मॉल’वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली असून शहरातील सुरक्षेचा…

Read More

डॉक्टरांसोबत परिचारिकांचेही योगदान अमूल्य- हरिष वाघमारे:कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन साजरा‎

“आरोग्य व्यवस्थेत रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरा इतकीच परिचारिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सेवाभाव, संयम, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर परिचारिका संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ बनल्या आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्या अखंड सेवेचा आणि कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिष वाघमारे यांनी केले. कुकाणे (ता. नेवासा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक…

Read More

लोकसेवेतून घडली स्वामी सेवा; आईचे स्वप्नही पूर्ण:अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नितीन गडकरींनी व्यक्त केल्या भावना‎

अक्कलकोट “विदर्भ आणि नागपुरात स्वामींचे अनेक निस्सीम भक्त आहेत, त्यांपैकीच मी आणि माझे कुटुंबीय आहोत. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून देशात रस्ते प्रकल्पांचे जाळे विणताना सोलापूर ते अक्कलकोट या चौपदरीकरणाचे काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केले. या माध्यमातून स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध झाली असून, या लोकसेवेतून मला स्वामी सेवेचे मानसिक…

Read More

ऊषा उत्थुप यांनी व्हायरल पोस्टवर दिले स्पष्टीकरण:गायिकेने ‘दीदी’ गाण्याला ममता बॅनर्जींच्या निवडणुकीतील पराभवाशी जोडण्याच्या दाव्यांना चुकीचे ठरवले

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांच्या एका गाण्याचा संबंध ममता बॅनर्जींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाशी जोडला गेला होता. गायिकेने हे दावे चुकीचे असल्याचे सांगितले. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा X वर एका वापरकर्त्याने उत्थुप यांचे ‘दीदी’ हे बंगाली गाणे गातानाचा व्हिडिओ…

Read More