लग्नात पाहुण्यांना फेट्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी:सोनोशीच्या गिते अन् खंबाळे येथील आंधळे परिवाराकडून 700 पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप
लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, बडेजाव.. मात्र, या परंपरेला फाटा देत खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे व सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते परिवाराने एका अनोख्या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श ठेवला . सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब व अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा…