उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास:500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात…