सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?:मुख्यमंत्र्यांकडे मागूनही संरक्षण नाही, माझ्यासह कुटुंबाला धोका- विकास लवांडे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही संरक्षण न मिळाल्याने, सरकार आपल्या हत्येची वाट पाहत आहे का, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. लवांडे यांनी आपल्या अटकेबाबत माहिती दिली….