Headlines

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच…

Read More

जायकवाडी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू:खोलीचा अंदाज चुकला अन् काळाने घातली झडप, सुट्टीचा बेत ठरला जीवघेणा

जायकवाडी धरण परिसरात रविवारी (दि. 31) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली, धरण पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सात मित्रांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबिका नगर, मुकुंदवाडी परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका नगर (मुकुंदवाडी) येथील सात युवक रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि जायकवाडी धरण परिसर पाहण्यासाठी…

Read More

मधाळ स्वरांच्या 'सुमन' सुगंधाचा शेवट:ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे आज, ३१ मे २०२६ रोजी मुंबईत दुःखद निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका दैवी आणि सुरेल युगाचा अंत झाला असून, संगीतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे….

Read More

अनिकेत तटकरेंसाठी युती धर्म पाळा:एकनाथ शिंदेंच्या आपल्या आमदारांना सूचना, कोकण विधान परिषदेची जागा गेली राष्ट्रवादीकडे

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला पेच अखेर सुटला असून, प्रतिष्ठेची मानली जाणारी कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, “युतीधर्म पाळा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणा,” अशा कडक सूचना आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत….

Read More

पुणे दारूकांडात 22 मृत्यू; हातभट्टी हद्दपार करा:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी, आरक्षणावरही भूमिका स्पष्ट

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे रसायनयुक्त विषारी दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीची दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी सूचना केली. ही दारू केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात सर्रास विकली जाते आणि ती अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हटले. आठवले यांनी काही मृतांच्या…

Read More

बनावट कामगार प्रमाणपत्रे देणारे रडारवर:नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 2 ऑनलाईन केंद्रांवर छापे

नागपूर ग्रामीण पोलिसांनी बांधकाम कामगारांच्या सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात एकही दिवस काम न केलेल्या व्यक्तींना ‘९० दिवस काम केल्याचे’ खोटे दाखले देऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध…

Read More

प्रियकराकडून तरुणीची 18 लाखांची फसवणूक:पैसे परत मागितल्यावर समाज माध्यमांवर फोटो व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

पुण्यात एका प्रियकराने तरुणीची १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसायासाठी कर्ज काढायला लावून प्रियकराने ही फसवणूक केली. तरुणीने पैसे परत मागितल्यावर त्याने तिचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात एका तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. रोहित अतुल पाटील…

Read More

जागतिक तंबाखू निषेध दिन; काँग्रेसकडून 'व्यसनांची होळी' उपक्रम:डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले – तरुणांना व्यसनमुक्त करणे आवश्यक

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (३१ मे) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातर्फे ‘व्यसनांची होळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी युवा पिढीला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. गंगवाल म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढी निरोगी आणि व्यसनमुक्त असणे आवश्यक…

Read More

शिरूरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा:एक अटकेत, 500 लिटर रसायन, 200 लिटर दारू जप्त

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात निमगाव भोगी परिसरात शिरूर एमआयडीसी पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू आणि एक मोटार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके…

Read More

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांमुळे योजनांचा बोजवारा:आमदार रईस शेख यांचे सुनेत्रा पवारांना पत्र, केल्या विविध मागण्या

राज्यातील अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुस्लीम आमदारांची पहिलीच महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विभागातील रिक्त पदे भरण्यासह १२ प्रलंबित मागण्यांचे पत्र उपमुख्यमंत्री पवारांना धाडले आहे. “विभागातील ४०६ रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळा येत असून, ही…

Read More