Headlines

शिरूरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा:एक अटकेत, 500 लिटर रसायन, 200 लिटर दारू जप्त




पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात निमगाव भोगी परिसरात शिरूर एमआयडीसी पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू आणि एक मोटार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके वस्ती, निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. त्याच्याविरुद्ध शिरूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव भोगी गावातील शेळके वस्तीत लोंढे हा गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे, २९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर यापूर्वीही गावठी दारू विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.पोलीस निरीक्षक महादेव वाघमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, विलास आंबेकर, संतोष ओैटी, उमेश कुतवळ, योगेश गुंड, विद्या बनकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर, अजित पवार आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक थोरात करत आहेत. विवाहाच्या आमिषाने फसवणूक, तरुणीची आत्महत्या दरम्यान, पुणे शहरातील सहकारनगर भागात विवाहाच्या आमिषाने फसवणूक झाल्याने एका अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी युवतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवतीच्या नातेवाईकांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण मूळचा सोलापूर जिल्ह्यातील फोडशिरस गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची अल्पवयीन युवतीशी ओळख झाली होती. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.युवतीने जेव्हा विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने नकार दिला. आरोपी तरुणाने दिलेल्या त्रासामुळे युवतीने नुकतीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *