ताडोबासह परिसरातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:बंगळुरू स्थित वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीने खळबळ
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि परिसरातील काही वाघ बेपत्ता असल्याच्या संशयावरून वन्यजीव वर्तुळात चिंता व्यक्त होत असतानाच, वनविभागाने बंगळुरू येथील एका नामांकित वन्यजीव छायाचित्रकाराची सुरू केलेली चौकशी आता अत्यंत गंभीर वळणावर आली आहे. जंगलात संशयास्पद हालचाली करणे, नियम मोडणे आणि चक्क वाहनातून मृत जनावरांची (मेलेली जनावरे) वाहतूक केल्याच्या संशयावरून वनविभाग या छायाचित्रकाराची कसून चौकशी करत आहे. मिळालेल्या…