करमाळा तालुक्यात 52,591 हेक्टरवर खरीप पेरणी:मका, तूर पेरणीत होणार वाढ, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची खोल नांगरणीसह मशागतीची कामे वेगाने सुरू
करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला . तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची…