"मजीप्रा'त ठिय्या; अभियंत्यांना नळ, पाइप, माठ दिला भेट:बांगड्या घालण्याचाही प्रयत्न; 5 दिवसांनी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
उन्हाळा तीव्र होत असतानाच २५ दिवसांनंतरही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अकोला तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. पाण्यासाठी असलेले पाइप, नळ व माठ अभियंत्यांना भेट देत अनोख्या पद्धतीने पाणी मिळत नसल्याचा निषेध केला. अभियंत्यांना धारेवर धरत जाबही…