संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…