चोपड्यात प्रतिबंधित गोमांस विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई:80 किलो मांसासह हत्यारे जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा
शहरातील शेतपुरा परिसरात प्रतिबंधित गोमांसाची कथित चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. कुरेशी मोहल्ल्यातील जमातखान्याजवळ असलेल्या पत्री शेडमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत 80 किलो गोवंश जातीचे मांस, लोखंडी वजनकाटा आणि मांस कापण्यासाठी वापरली जाणारी धारदार हत्यारे असा सुमारे 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी…