महावितरणचा उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात:सोलर रिलीज ऑर्डरसाठी घेतली एक हजार रुपयांची लाच
धामणगाव रेल्वे येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, बुधवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आली, ज्यामुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. राहुल निळकंठ उमरे (वय ४९) असे अटक केलेल्या उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याने सोलर पॅनलच्या ‘रिलीज ऑर्डर’सह…