गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन आरोपींचे वय 16 वर्षे करा:पुणे पोर्शे कार अपघातातील मृत अनिश अवधियाच्या पालकांची मागणी
पुणे पोर्शे कार अपघातात मुलगा गमावलेल्या अनिश अवधिया यांच्या पालकांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपींचे वय 18 वरून 16 वर्षांपर्यंत कमी करावे, असे ओमप्रकाश अवधिया आणि सविता अवधिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कायद्याचा धाक समाजात राहिला पाहिजे, तरच नियमांचे पालन होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अक्षय जैन उपस्थित होते….