Headlines

Supriya Sule Targets Government Over Ajit Pawar Accident Probe In Thane


“एका महाविद्यालयातून केवळ फोटो हटवला म्हणून अमित ठाकरे यांच्यावर अवघ्या दोन तासांत गुन्हा (FIR) दाखल होतो. मात्र, सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा इतका मोठा भीषण विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो, तरीही सरकार साधा गुन्हा नोंदवत नाही. हा कुठला न्

.

माझा भाऊ गेला, पण सरकारमधील 40 आमदारांचे संशयास्पद मौन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना सुप्रिया सुळे अत्यंत भावुक आणि आक्रमक झाल्या. “अमित ठाकरे यांनी फोटो काढला म्हणून लगेच कारवाई होते. आम्ही आमच्या घरातील कर्ता पुरुष गमावला. एका विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा अपघात होतो, पण त्यावर सरकार एफआयआर का नोंदवत नाही? तपासाची नेमकी परिस्थिती काय आहे, हेही कोणाला माहीत नाही.”

“अजित पवारांचा पक्ष सत्तेत भागीदार आहे, त्यांचे 40 आमदार आणि मंत्री सत्तेत बसून मलिदा भोगत आहेत. मात्र, त्या एकाही आमदाराने किंवा मंत्र्याने माझ्या भावाच्या मृत्यूची चौकशी व्हावी किंवा एफआयआर दाखल व्हावा म्हणून आजपर्यंत एक शब्दही उच्चारला नाही. भाऊ आमचा गेला आणि सत्ता हे भोगत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयात सिनेमासारखी ‘तारीख पे तारीख’

पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ देत त्यांनी न्यायव्यवस्थेतील दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. “आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, सिनेमात आपण ‘तारीख पे तारीख’ पाहायचो, तोच प्रकार आज आमच्या बाबतीत घडतोय. आम्ही तब्बल सहा वेळा न्यायालयात धाव घेतली, तरी आमच्या पक्षाची केस बोर्डावर लागत नाही. एकाच प्रकरणात एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का?” असा प्रश्न त्यांनी केला.

ठाणेकरांचा विरोध असल्यास ‘डेटा सेंटर’ होऊ देणार नाही

ठाण्यातील विकासकामांवर आणि स्थानिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. “ठाण्यातील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटरला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने भूमिका घेतली असून, जर ठाणेकरांना ते नको असेल, तर हे डेटा सेंटर इथे होऊ देणार नाही.”

“सरकारला केवळ हजारो कोटींच्या ‘बिग तिकीट’ प्रकल्पांमध्ये रस आहे. रस्ते, खड्डे, आरोग्य, शिक्षण यावर खर्च करायला पैसे नाहीत. ठाण्यात मेट्रोऐवजी सक्षम बस कनेक्टिव्हिटी दिली तर सामान्यांचे काम ५०० रुपयांत होईल, पण सरकारला कोट्यवधींचे महागडे प्रकल्प राबवायचे आहेत.”

घरात जाऊन विचारा, महागाईने जगणे कठीण केलेय

केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक दाव्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. “सरकार 7.8 टक्के विकासदराचा जल्लोष करत आहे, पण तो गरिबांच्या पोटावर पाय देऊन करू नये. बाजारात फूड इन्फ्लेशन प्रचंड वाढले आहे. डाळी, तेल, भाज्या महागल्या आहेत, दूध शंभरी पार गेले आहे. घरात जाऊन महिलांना विचारा, चहामध्ये दूध टाकायचे की नाही अशी परिस्थिती झाली आहे.”

“जर अर्थव्यवस्था एवढी मजबूत आहे, तर मग पंतप्रधानांनी नागरिकांना सोने खरेदी करू नका असे का सांगितले? महिलांसाठी सोने हा केवळ दागिना नसून संकटसमयी उपयोगी पडणारी सुरक्षित गुंतवणूक असते.” निवडणुकीच्या तोंडावर योजना आणायची आणि मतदान संपताच तब्बल १ कोटी महिलांची नावे यादीतून बाद करायची, असा दुटप्पी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिला आरक्षणावरून भाजपचे आंदोलन ढोंगी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या. “संसदेत सर्व पक्षांनी एकमुखाने नारी शक्ती वंदन (महिला आरक्षण) विधेयक मंजूर केले होते. काँग्रेसने कधीही या विधेयकाला विरोध केला नाही, याचे संसदेत अधिकृत पुरावे आहेत.”

“आज ज्या भाजपच्या महिला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्षा किंवा महापौर आहेत, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेल्या ५० टक्के आरक्षणामुळेच त्या पदावर पोहोचल्या आहेत. सत्तेत असताना विरोधकांच्या कार्यक्रमांवर आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे.”

दरम्यान, राज्यात मराठा, ओबीसी, आदिवासी विद्यार्थी, शेतकरी आणि डॉक्टर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून २०० आमदारांचे बहुमताचे सरकार असूनही जनतेला न्याय मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

हेही वाचा…

अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात फडणवीस सरकार काहीतरी लपवतंय:नाना पटोलेंचा थेट आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेवरही सवाल

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांत अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आता काँग्रेसनेही जाहीर पाठिंबा दिला आहे. “अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात फडणवीस सरकार नक्कीच काहीतरी लपवत आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. याशिवाय, सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या मौनावरही त्यांनी संशय व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी अजितदादांचा अपघाती मृत्यू, राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरील पंतप्रधानांच्या दाव्यांवरून सरकारवर कडाडून टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.