Headlines

Pankaja Munde On Devendra Fadnavis Deputy PM Claim


देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी नेतृत्व आहे. मी त्यांच्यासोबत गेली 25 वर्षे काम करत आहे. ते आज ज्या पदावर आहेत, तिथून अधिक मोठे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे; पण सध्या ते जिथे आहेत तिथेच राज्याला त्यांची गरज आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंड

.

देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करायचे हे संघ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संजय राऊत यांनाच सांगितले असावे, त्याशिवाय ते एवढ्या आत्मविश्वासाने कसे बोलू शकतात? असा टोला पंकजा मुंडे यांनी राऊतांना लगावला आहे. तर मराठा आरक्षणसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी दर दोन तासांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत आहे. संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे.

देशातील शेतकरी आनंदी

पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशात गेल्या 10 वर्षांत देशात रस्ते, हायवे, मेट्रो आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योग उभे राहत असून शेतकरी आनंदी आहे. तसेच लखपती दीदी आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांमधून महिलांचे सबलीकरण होत असून देश एका सकारात्मक प्रवासाकडे निघाला आहे.

हे ही वृत्त वाचा

हे ही वृत्त वाचा फडणवीसांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची शक्यता:गृहमंत्री कधीच पंतप्रधान होत नाही, संजय राऊतांचे मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून एक मोठी जबाबदारी द्यायची आहे. दिल्लीबाहेर असलेल्या एका नेत्याची उपपंतप्रधानपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही हीच भूमिका असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर राऊतांना उबाठाचे प्रतिपक्षप्रमुख नाही तर पक्षप्रमुख व्हायचंय:ठाकरेंचे 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, नवनाथ बन यांचा दावा

उबाठाचे 13 ते 14 आमदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जायला तयार झाले आहेत, राऊतांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर उद्या उठून पुन्हा बोंब मारतील की आमचे खासदार, आमदार आणि नगरसेवक पळवले, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठाला लगावला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.