Headlines

Vidyanand Bapat Attacked in Pune; Ganesh Utsav DJ Controversy


पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिका

.

मुलाखत सुरू असतानाच अचानक हल्ला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्याच वेळी स्थानिक गणेश मंडळांशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या 4 ते 5 तरुणांचा गट तिथे आला. त्यांनी बापट यांना अडवून त्यांच्याशी वाद घातला आणि काही क्षणांतच त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी काही काळ अवाक झाले.

कोण आहेत विद्यानंद बापट?

विद्यानंद बापट (वय 37) हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेले बापट हे बीपीओ (BPO) क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ काम करतात. त्यांच्या मागे कोणताही मोठा राजकीय वारसा नसून ते एक सामान्य व सुजाण पुणेकर म्हणून ओळखले जातात.

महापालिकेच्या बैठकीतील आक्रमक भूमिका

पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशोत्सवपूर्व नियोजन बैठकीत बापट यांनी डीजेच्या भिंती, लेझर आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात परखड भूमिका मांडली होती. “आमचा गणेशोत्सवाला विरोध नाही, पण उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण आणि मुख्य रस्ते बंद करून काढल्या जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमुळे रुग्णांना, वृद्धांना व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबला पाहिजे,” असे मत त्यांनी प्रभावीपणे मांडले होते.

संस्कृत श्लोक आणि सोशल मीडियावरील चर्चा

बैठकीतील त्यांच्या अस्खलित मराठी आणि संस्कृत श्लोकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रसिद्धीच्या हव्यासावर बोट ठेवताना त्यांनी “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्” (मडके फोडावे, वस्त्र फाडावे किंवा गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे) हा संस्कृत श्लोक म्हणून दाखवला होता, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

ध्वनिप्रदूषणाचा लढा तीव्र; मानवाधिकार आयोगाचीही नोटीस

बापट यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला पुण्यातील अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) दाद मागितली आहे. या तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणाऱ्या एका सुजाण नागरिकावर भरदिवसा अशा प्रकारे गुंडगिरी करून हल्ला झाल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा..

पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा: रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महापालिकेच्या विधी समिती सदस्य मिताली कुलदीप साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक वक्तव्ये तसेच व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.