Headlines

मुंबई पोलिसांची कामगिरी:‘टायगर’वरील तिन्ही हल्लेखोर ‘एआय’मुळे 15 तासांतच कोटा रेल्वेस्थानकात जेरबंद, एआय फेस रिकग्निशनने शूटर्सची प्रत्येक हालचाल टिपली



बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या रिहान ऊर्फ सुक्का, रितिक कुर्मी आणि एका अल्पवयीन अशा तिन्ही शूटरना एआय फेस रिकग्निशन तंत्रामुळे घटना घडल्यापासून १५ तास ३० मिनिटांत म्हणजे सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राजस्थानातील कोटा रेल्वे स्

.

त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता गोळीबार करून अंधेरी रेल्वेस्थानकावरून जयपूर व तेथून उत्तर प्रदेशमार्गे नेपाळमध्ये पलायनाचा हल्लेखोरांचा इरादा होता.

त्यांना लॉरेन्स बिष्णोई गँगमधील अनिल पंडितने केवळ ३४ हजार रुपयांत टायगरला मारण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर मुंबईतून रेल्वेत बसल्यापासूनची इत्थंभूत माहिती मंुबई पोलिस राजस्थान पोलिसांना देत होते. मुंबई क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राजतिलक रौशन यांनी या कारवाईचा घटनाक्रम जाहीर केला. अंधेरी स्थानकावर हल्लेखोरांचे चेहरे सीसीटीव्हीमध्ये टिपले गेले. त्यानंतर एआय फेस रिकगनेशन तंत्राने पोलिसांना बहुमोल मदत मिळाली. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ बाईक फेकून हल्लेखोरांनी सुरत गाठली. तेथून पुणे-जयपूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ते लपले होते.

एका हल्लेखोरावर आधीचा गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांची माहिती अशी. रिहान उर्फ ​​सुक्का: त्याच्यावर चोरी आणि शस्त्र कायद्यांतर्गत आधीच गुन्हे दाखल आहेत. तो मुंबईत मजूर म्हणून काम करत होता.} हृतिक कुर्मी: तो अंधेरी पश्चिममध्ये राहत होता आणि रॅपिडो टॅक्सी चालवत होता. तो महिनाभरापासून हे काम करत होता. हल्ल्याच्या वेळी तो बाईक चालवत होता. अल्पवयीन: त्याने टायगरच्या गाडीच्या खिडकीवर बंदूक रोखून त्याला गोळी घालण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल अडकल्याने टायगर बचावला.} तिन्ही आरोपींनी रेल्वेतच केस कापून कपडे बदलले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोणतेही पिस्तूल जप्त केलेले नाही. सध्या, आरोपींना ४८ तासांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमेरिकेतील एक गँगस्टर महिनाभरापासून आरोपींच्या हॉटेल, जेवण, टॅक्सीचे बिल ऑनलाइन भरत होता : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरच्या हत्येचा कट साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचला होता. लॉरेन्सचा अनिल पंडित नावाचा गँगस्टर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून टोळी चालवतो. तिन्ही आरोपी महिनाभर मुंबईत होते. पंडितने घटनास्थळाची पाहणी, पुष्पा पार्क, हॉटेल, जेवण आणि सुरतच्या टॅक्सीचे सर्व पैसे अमेरिकेतून ऑनलाइन भरले होते. गोळीबारादरम्यान तो मोबाईल फोनद्वारे नेमबाजांच्या थेट संपर्कातही होता. टायगरला बिष्णोई गँग किंवा अन्य कोणाकडून आधी धमक्या आल्या होत्या का? यावर डीसीपी राजतिलक रौशन यांनी स्पष्ट केले की, सध्या अशा कोणत्याही धमकीची अधिकृत नोंद पोलिसांच्या रेकॉर्डवर नाही.हल्लेखोरांनी वापरलेली दोन पिस्तुले कुठे लपवली वा फेकून दिली, याचा शोध घेण्यासाठी डीसीपी राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपींची कसून चौकशी करणार आहे.

३ टप्प्यात काम करते

१. कॅमेऱ्यात टिपलेला चेहरा कुठे आहे, हे एआय प्रणाली सर्वात आधी शोधते. २. दोन डोळ्यांतील अंतर, नाकाचा आकार आदींच्याचे अचूक मोजमापातून मानवी बोटांच्या ठशांसारखा युनिक फेसप्रिंट तयार होतो. ३. हा फेसप्रिंट सिस्टीमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह माहितीशी तंतोतंत जुळल्यास सिस्टीम व्यक्तीची अचूक ओळख पटते.

गुन्हेगारी टोळ्यांवर पाळत, वाहन तपासणी गरजेची

हल्लेखोरांनी घटना, कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान दिले आहे. बिहार, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांत गुन्हेगारी टोळ्यांसाठी शस्त्रास्त्रे, दारूगोळा तयार केला जात आहे. म्हणून गुंडांच्या टोळ्या, शस्त्र पुरवणाऱ्यांवर पोलिसांची सातत्याने कडक पाळत अत्यंत गरजेची आहे.

आंतरराज्य टोळ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. यात रस्त्यांवर वाहने आणि संशयित व्यक्तींची नियमित आणि अचानक तपासणी अत्यंत उपयुक्त ठरेल. दुचाकीवरून येऊन गोळीबाराला आळा घालण्यासाठी शासनाने विशेष आदेश काढण्याची गरज आहे. संवेदनशील किंवा विशिष्ट भागांत दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशाला (पिलियन रायडर) बंदी घालण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात यावेत.

टायगरच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलू : फडणवीस

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगरला फोन करून ‘तू कोणतीही चिंता करू नकोस. ज्यांनी हे केले आहे, त्यांना आम्ही शोधून काढू आणि तुझ्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलू,’ अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, हल्लेखोरांच्या पाठीशी कोण आहे याचाही शोध घेतला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *