![]()
पाळधी दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे योग्य नियोजन, उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर व आधुनिक पद्धतीने चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाळधी येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान राबवण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय पाळधी व जीपीएस फाउंडेशनतर्फे पशुपालकांना चारा टंचाईवरील उपायांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी पशुपालकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. चाराटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास जाधव, पं. स.चे माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल शिंदे व डॉ. जे. एस. नारखेडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. अशोक महाजन यांनी केले. राहुल साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. मार्गदर्शन करताना प्रतापराव पाटील. मुरघासबाबत प्रात्यक्षिक बांभोरी येथील पशुखाद्य उद्योजक योगेश पाटील यांनी सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून मका पिकापासून बेलर मशीनद्वारे मुरघास निर्मिती कशी केली जाते, याची माहिती दिली. या वेळी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे रब्बी चारा बियाण्यांसाठी गुगल फॉर्म भरून प्रत्यक्ष नोंदणी करण्यात आली.
Source link
पाळधीत चारा साक्षरताआणि संवर्धन अभियान:पशुसंवर्धन विभाग, जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम