![]()
श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेनिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देवीला मानाची साडी-चोळी, ओटीचे साहित्य, हळद-कुंकू आणि प्रसाद अर्पण करण्यात आला. पोलीस बँडच्या वादनासह ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या निनादात निघालेल्या
.
गडावरील नारळ गेटपासून मानाची साडी-चोळी व पूजेचे साहित्य वाजतगाजत आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व त्यांच्या पत्नी गायत्री सुदर्शन, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व आश्विनी राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व कविता मुटकुळे, तसेच पाथर्डीचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे व तेजश्री कंडारे यांनी सपत्नीक देवीची पूजा करून आरती केली. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील व रेणुका पाटील उपस्थित होते.
देवस्थानच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. विश्वस्त शशिकांत दहिफळे, अॅड. कल्याण बडे, अॅड. प्रसन्न दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आणि जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते.
मोहटादेवीच्या पूजेचा मान मिळणे ही पोलीस दलासाठी सौभाग्याची बाब असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले.