![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर-वांबोरी प्रमुख जिल्हा मार्गावरील वांबोरी घाटात दरीच्या बाजूच्या कठड्यांना एका खासगी कंपनीची केबल क्लॅम्प लावून ठोकण्यात आली आहे. आधीच जुने व कमकुवत झालेले कठडे आणखी धोकादायक बनले असून ते कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. कठडे कोसळल्यास वाहन खोल दरीत पडून अपघात होऊ शकतो. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अहिल्यानगर-मनमाड व छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या दोन्ही महामार्गांवर अडचण निर्माण झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता महत्त्वाचा ठरतो. घाटाचे अनेक वर्षांपासून रुंदीकरण झालेले नाही, घाटात विजेचे दिवेही नाहीत. रस्ता अरुंद असल्याने घाट धोकादायक मानला जातो. अशा स्थितीत घाटाच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यासंदर्भात माहितीसाठी कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, तो होऊ शकला नाही. ^घाटात खोल दरीच्या बाजुने असलेले कठडे सुरक्षेच्या दृष्टिने महत्वाचे आहेत. अशा स्थितीत कठड्यांनाच जर अशा पद्धतीने केबल ठोकले जात असतील. तशी परवानगी मिळत नाही. उद्या कठडे दुरुस्त करताना ढासाळलेले कठडे तळापासून पाडून पुन्हा बांधावे लागतील. त्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. एन. डी. कुलकर्णी, निवृत्त, शहरअभियंता. परवानगी देता येणार नाही
Source link
वांबोरी घाटात केबलसाठी कठड्यांना ठोकले क्लॅम्प, कठडे कोसळण्याची भीती; बांधकामचे दुर्लक्ष