![]()
कर्जमाफीच्या तीन याद्यांमध्ये पात्र असूनही नाव आले नाही, तसेच मुलीची शैक्षणिकफी माफ झाली नसल्याने आर्थिक अडचणींचासामना करावा लागत आहे, असा व्हिडिओकाढून शेतकऱ्यानेगळफास घेऊनआत्महत्या केली. नांदेड तालुक्यातील बोरगावतेलंग येथे सोमवा
.
नांदेड शहरापासून सुमारे १५ किलोमीटरअंतरावर असलेल्या बोरगाव तेलंग येथीलशंकर क्षीरसागर यांच्याकडे पाच एकरजमीन आहे. नापिकीमुळे आर्थिक संकटनिर्माण झाले असताना राज्य सरकारनेजाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभहीमिळाला नसल्याची व्यथा त्यांनीव्हिडिओतून मांडली होती.
मुलगी एमबीबीएसला, मुलगा अभियांत्रिकीला
क्षीरसागर यांची मुलगी पुण्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे, तर मुलगा अभियांत्रिकीचेशिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांच्याशिक्षणाचा खर्च, शेतीतील नापिकी आणिकर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने निर्माणझालेल्या आर्थिक अडचणींच्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊलउचलले.
व्हिडिओतील संवाद असा
हॅलो! कलेक्टर साहेब, मी विनंती करत आहे.तीन कर्जमाफी झाल्या तरी एकाही कर्जमाफीतमाझं नाव आलं नाही. त्या निमित्तानं मीआत्महत्या करतोय. शासनानं माझी गांभीर्यानंदखल घ्यावी. शासन म्हणतं फी माफ आहे,माझी मुलगी शिवानी शंकर क्षीरसागरमेडिकलला आहे. कलेक्टर साहेबांना मी विनंतीकरतो, गांभीर्यानं याची चौकशी करावी. मीशेतकरी म्हणून आत्महत्या करतो. मीतुमच्यासारखाच आहे… चालतो.