![]()
कॉलेजमधील जुन्या वादात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून, एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भरदिवसा बुलेट आडवी लावून धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्याने त्याचा जीव वाचला. मात्र मदतीसाठी धावून आलेल्या मित्रावरही “सोन्या, इसको भी डाल दे” असे म्हणत चाकूने सपासप वार करून त्याला रक्तबंबाळ करण्यात आले. हा थरार शनिवारी (१७ ऑक्टोबर) सिडको परिसरात घडला. या प्रकरणी सिडको ठाण्यात हर्ष राठोड (रा. बंबाटनगर), स्वप्निल राठोड, संकेत राठोड आणि सोन्या या चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रीतमसिंग देविचंद बारवाल (२२, रा. हर्सूल) हा एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचा मित्र सौरभ पाटील याचे १३ ऑक्टोबरला कॉलेज परिसरात हर्ष व स्वप्निल राठोड यांच्याशी भांडण झाले होते. त्या वेळी प्रीतमने मध्यस्थी करून वाद मिटवला होता. याचाच राग आरोपींच्या मनात होता. मित्रावरही सपासप वार प्रीतम रक्तबंबाळ झाल्याचे पाहून मागे बसलेला मित्र दिग्विजय मदतीला धावला. त्यावेळी स्वप्निल आणि संकेत यांनी दिग्विजयला पकडून ठेवले. हर्षच्या सांगण्यावरून सोन्याने त्याच्या मांडीवर व हातावर चाकूने वार केले. नागरिक गोळा होत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
Source link
भरदिवसा रस्त्यात बुलेट आडवी; विधी शाखेच्या विद्यार्थ्यावर हल्ला:कॉलेजच्या वादात मध्यस्थी केल्याचा राग; चौघांवर गुन्हा