लाखनी नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षाला उच्च न्यायालयाचा 'ब्रेक':नगराध्यक्ष निवडीला अंतरिम स्थगिती; 17 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश
लाखनी नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा ‘ब्रेक’ दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेला खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून, यामुळे स्थानिक राजकीय घडामोडींना अनपेक्षितपणे खीळ बसली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांना पदमुक्त केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी जिल्हा प्रशासनाने ३१ जुलै रोजी विशेष सभा बोलावून नवीन नगराध्यक्ष निवडीची…