![]()
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाने वेगवान व तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली. चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनची रू १२,६०० रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत करून ज्येष्ठ महिलेला दिलासा दिला आहे. समर्थ नगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या फत्तेसिंह चौकातील के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात पेन्शन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी ₹१२,६०० रक्कम काढून ती अर्ध्या तोळ्याच्या बोरमाळीसह पर्समध्ये ठेवली होती. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्या काही वेळ सेवा केंद्रात थांबल्या आणि नंतर रिक्षाने घरी गेल्या. घरी पोहोचल्यावर पर्समधील रोख रक्कम व दागिना चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसतानाही डी.बी. पथकाने फत्तेसिंह चौकातील आयडीबीआय बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांची कसून चौकशी यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. अक्कलकोट उत्तर पोलिसाकडून अटक या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ सुतार यांनी केली. {कुर्डुवाडी | माढा तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
Source link
24 तासांत चोराला अटक; महिलेचे दागिने केले परत:अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या पथकाची कामगिरी