![]()
रामाचे पिंपळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या ‘उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी घेण्यात आली. या चाचणीत २७ महिला आणि ५ पुरुष अशा एकूण ३२ नवसाक्षरांनी सहभाग नोंदविला. महिलांचा लक्षणीय सहभाग हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. समाजातील १५ वर्षे व त्यावरील निरक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांच्यात वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाची मूलभूत क्षमता विकसित करणे, हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. शिक्षणाची संधी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दैनंदिन व्यवहारांत वाचन, लेखन आणि अंकज्ञानाचा उपयोग व्हावा, तसेच आरोग्य, आहार, मतदान, कायदेविषयक माहिती आणि जीवनकौशल्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. चाचणीद्वारे अध्ययनार्थींच्या मूलभूत शैक्षणिक क्षमतांचे मूल्यमापन केले जाते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे, क्रीडा शिक्षक विलास गायकवाड, ज्ञानेश्वर उगले, रवींद्र उगले, गोपाळ चव्हाण आदी शिक्षक व शिक्षिकांनी सहकार्य केले.
Source link
32 नवसाक्षरांनी दिली साक्षरता चाचणी:पिंपळस रामाचे येथे ‘उल्लास’ उपक्रम; 27 महिलांचा सहभाग