![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर राज्यभरात तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. परभणी, बीड आणि हिंगोलीसह अनेक ठिकाणी संतप्त ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर खासदारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार संजय जाधवांच्या प्रतिमेची काढली अंत्ययात्रा
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शिवसैनिकांनी खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ‘गद्दार संजय जाधव’च्या घोषणा देत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. तर बीडमध्येही बंडखोर खासदारांच्या निषेधार्थ प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. “या खासदारांना बीड जिल्ह्यात येऊ देणार नाही,” असा इशाराही शिवसैनिकांनी दिला. आम्ही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे..
दरम्यान, हिंगोलीत शिवसेना कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महायुतीत जाणार असतील तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. तसेच, “आम्ही आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी भूमिका हिंगोलीतील शिवसैनिकांनी व्यक्त केली. सहा खासदारांच्या कथित बंडानंतर ठाकरे गटातील नाराजी आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. आता ‘ऑपरेशन तुडवा’ने उत्तर देणार: संजय राऊत कडाडले भाजप नेते गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. होय, आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या, कारण त्यांनी गद्दारी केली आहे. पण तुम्हाला त्यांच्याविषयी एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा सवाल करत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केला. तसेच पक्ष सोडून गेलेल्या 6 खासदारांवर कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप त्यांनी केला. ऑपरेशन टायगरवर बोलताना राऊत यांनी थेट चेतावणी दिली. “शिवसेना जर ऑपरेशन टायगर करत असेल, तर आम्ही आता त्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करत आहोत. ‘तुडवा’ हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आदेश होता. गद्दारांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना कसे तुडवायचे हे शिवसैनिकांना चांगले ठाऊक आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तास द्या…” असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीला थेट आव्हान दिले आहे. सविस्तर वाचा
Source link
6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंची शिवसेना संतप्त:परभणीत संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, बीडमध्ये जाळपोळ