Headlines

74 जळगाव येथे‎ दहावी, बारावीतील‎ गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात‎:अशा उपक्रमांमुळे शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण होते – शिवराज भुमरे




पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथे बाबासाहेब एरंडे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नुकताच जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते पार पडला झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम एरंडे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब एरंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी ७४ जळगाव, खामजळगाव व शहापूर मानेगाव या गावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये दहावी, बारावी परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल प्रोत्साहन देणे तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा होता. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अधिक प्रेरणा निर्माण होते, असे मत यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी व्यक्त केले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक मोरे, राम एरंडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप, पंचायत समिती उपसभापती संजय लघाने, उपतालुकाप्रमुख सतीश शेळके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास युवासेना मराठवाडा निरीक्षक ज्योतीराम पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके, पैठण पंचायत समितीचे उपसभापती संजय लघाने, जिल्हा परिषद सदस्य दिलीप जगताप, नगरसेवक मोहित त्रिवेदी, उपतालुकाप्रमुख सतीश शेळके, बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भरत मोरे, मावसगव्हाणचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, राहुल उघडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल मुळे, प्रास्ताविक शिक्षकसेना जिल्हाप्रमुख अमोल एरंडे तर आभार अॅड. सचिन एरंडे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *