Headlines

मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक

खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात आरोपी प्रवीण बाळकृष्ण कुर्वे याला मानकापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाची पार्श्वभूमी ३ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. गोधणी रोडवरील…

Read More

गांधी जयंतीला पुण्यात 17 किमी 'सत्याग्रह मार्च':प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पदयात्रा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी १७ किलोमीटरच्या सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत १२० हून अधिक तरुण, सजग नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहभाग घेतला. प्राण्यांवरील अत्याचार रोखणे, डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करणे आणि वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा…

Read More

नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी‎

शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य…

Read More

Tamil Nadu CM Vijay AI Deepfake Video Scam; CB-CID Probe Initiated

चेन्नई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या AI डीपफेक व्हिडिओद्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडू पोलिसांनी CB-CID ने 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्हिडिओमध्ये विजय यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती हिंदीमध्ये लोकांशी बोलताना आर्थिक मदतीसाठी एका व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधण्यास सांगत होता. हा बनावट व्हिडिओ…

Read More

यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचंड उष्णलहरींमुळे गेल्या 48 तासांत तब्बल आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचेच बळी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण…

Read More

Sambhaji Brigade Protest Against Rent A Garba Partner Ads

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘रेंट अ गरबा पार्टनर’ (Rent a Garba Partner) या जाहिरातींवरून संभाजी ब्रिगेड प्रचंड आक्रमक झाली आहे. गरबा डान्स करण्यासाठी १ हजार ते ५ हजार रुपयांची बोली लावून मुलींना भाड्याने . “महाराष्ट्रात पैशांनी पार्टनर विकला जातोय” सध्या सोशल मीडियावर गरब्यासाठी पार्टनर उपलब्ध करून देणाऱ्या अनेक जाहिराती फिरत आहेत….

Read More

पार्वतीनगर जलवाहिनी दुरुस्ती दुसऱ्या दिवशीही सुरू:२५ हजार नागरिकांना बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता

अमरावती: पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारपासून सुरू झालेले दुरुस्तीचे काम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिलेल्या माहितीनुसार, या जलकुंभाशी संबंधित सुमारे २५ हजार नागरिकांना बुधवार, १७ जून रोजी पाणी मिळण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वर यासह परिसरातील अनेक भागांतील नागरिकांना…

Read More

एनएचएमच्या 525 उमेदवारांची यादी अंतिम:10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकडे लक्ष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दीड हजाराहून अधिक डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांपैकी ५२५ उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व उमेदवारांची यादी शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी खास दूतामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रवीण पारिसे यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, पुढील प्रक्रियेबाबत…

Read More

एमपीएससी 2025 परीक्षापेपरची फेरतपासणी- सीएम:विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहाराविरुद्ध राज्यभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले. एमपीएससीच्या २०२५च्या परीक्षेतील केवळ गुणांची फेरबेरीज न करता संपूर्ण उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होईल. वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरपत्रिका माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ‘वर्षा’ बंगल्यावर विद्यार्थी संघटना प्रतिनिधींसोबत सलग पावणेदोन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले…

Read More