Headlines

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार:मुकादमाच्या मुलावर गुन्हा




पाथर्डी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याची आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून ते हंगामी कामासाठी नेहमी बाहेरगावी जात असतात. ऊसतोडीसाठी कामगार पुरवठा करणाऱ्या मुकादमाच्या मुलाची पीडित मुलीशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत मार्च २०२६ मध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला घरातून जबरदस्तीने पळवून नेले आणि एका ठिकाणी डांबले. त्यानंतर आरोपीने तिला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे नेले. तिथे जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीने अखेर १ ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून आपल्या आईशी संपर्क साधला. आपण सध्या पुणे जिल्ह्यातील न्हावरा येथे असल्याची माहिती तिने आईला दिली. ही माहिती मिळताच २ ऑगस्ट रोजी पीडितेचे आई-वडील तातडीने न्हावरा येथे पोहोचले आणि मुलीला सुखरूप आपल्या घरी घेऊन आले. घरी परतल्यावर सुरक्षित वातावरणात धीर आल्यानंतर अल्पवयीन मुलीने आपल्यावर ओढवलेला हा भयानक प्रसंग आईला सांगितला. मुलीची कहाणी ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी तातडीने पाथर्डी पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची लिखित फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धनंजय आठरे या आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *