Headlines

डिफेन्स हब:शिर्डीत 3,000 कोटी रुपये गुंतवणुकीतूनतोफगोळ्यांचा जगातील तिसरा मोठा प्रकल्प, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 23 मे रोजी लोकार्पण




साईबाबांची भूमी शिर्डी आता देशाचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र (डिफेन्स हब) म्हणून उदयास येत आहे. निवे ग्रुपने शिर्डी एमआयडीसीत अवघ्या १२ महिन्यांत ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून हा भव्य प्रकल्प उभारला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २३ मे रोजी याचे लोकार्पण होणार आहे. राज्य शासनाचा पुढाकार व ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून हा प्रकल्प वेगाने पूर्ण झाला. यातून तब्बल ५ हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. चीनपेक्षा सरस शस्त्रे लघुउद्योगांना बळ स्ट्रॅटेजिक लोकेशन: शिर्डी जवळच्या ‘समृद्धी महामार्गा’मुळे हा प्रकल्प मुंबई बंदराशी आणि विमानतळामुळे थेट उत्तरेकडील सीमेवरील तळांशी जोडला गेला आहे. यामुळे लष्कराला रसद पुरवणे अत्यंत सोपे होईल. स्थानिकांना रोजगार: अहिल्यानगर व नाशिकमधील लघुउद्योगांना (एमएसएमई) सुटे भाग बनवण्याची कंत्राटे मिळतील. स्थानिकांना रोजगार व अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. झिरो वेस्ट : स्फोटकांच्या उत्पादनासाठी पर्यावरणाचे भान ठेवून ‘झिरो वेस्ट’ मॉडेल राबवले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *