Headlines

रुग्णालयातील पांढऱ्या वस्त्रातील ‘दूत’ अन् आरोग्याच्या ‘आशा’:नर्सिंग कॉलेजमध्ये रंगला सेवेचा सन्मान, कार्यक्रमात सेवाभावी वृत्ती जोपासण्याचे केले आवाहन‎



रुग्णालयातील पांढऱ्या गणवेशातील परिचारिका असो किंवा वस्तीपातळीवर घरोघरी फिरणारी आशा सेविका, समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात या दोघींचेही योगदान एखाद्या योद्ध्याप्रमाणे आहे. सामाजिक आरोग्य सेवा तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यात परिचारिकांइतकाच आशा सेवि

.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून गुलमोहर रोडवरील प्रयत्न नर्सिंग कॉलेजमध्ये याच सेवेचा अनोखा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रांतील परिचारिका आणि आशा सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना खिल्लारी यांनी स्पष्ट केले की, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाल्याने त्यांच्यात समाजसेवेची प्रबळ भावना निर्माण होत आहे. संस्थेच्या संचालिका डॉ. शितल म्हस्के यांनी, परिचारिका आणि आशा सेविका हे आरोग्य व्यवस्थेचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर सेवाभावी वृत्ती जोपासण्याचे आवाहन स्टाफ नर्स वर्षा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य दिक्षा घाटविसावे यांनी आशा सेविकांनाही प्रगत नर्सिंग शिक्षण घेऊन व्यावसायिक परिचारिका बनण्याचे स्वप्न पाहण्यास प्रवृत्त केले.

या सोहळ्याला वैशाली आनंदकर, स्वाती कांबळे, सुनिता चौधरी, ज्योती बांगर, यांसह उपप्राचार्य स्मिता तडके, व्यवस्थापक मीना लाड व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक कृतज्ञता सोहळा ठरला.

मायेचा ओलावा जपण्याचे आवाहन परिचारिका हे केवळ एक पद नसून ती एक समर्पण वृत्ती आहे. रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम नर्सेस अहोरात्र करतात. आजच्या काळात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी, परिचारिकेच्या हातातील स्पर्श आणि मायेचा ओलावा औषधांइतकाच प्रभावी ठरतो. हाच वारसा जपण्याचे आवाहन यावेळी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *