Headlines

छावा प्रतिष्ठानचा महिला अत्याचारावर आधारित देखावा:महिलांच्या हस्ते जलाभिषेक अन् बुधभूषण ग्रंथाचे पूजन, शिवराज्य सेनेकडून शरीरसौष्ठव स्पर्धा



बार्शी शहर व तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध संघटनांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शंभूभक्तीत न्हाऊन निघा

.

छावा प्रतिष्ठानच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून बार्शी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला. तसेच महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचेही विधीवत पूजन करण्यात आले.

कसबा पेठेतील शिवराज्य सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १३ रोजी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

या उत्सवाचे औचित्य साधून शिवराज्य सेनेने शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बार्शी शहर आणि परिसरात विविध संघटनांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

. प्रबोधनात्मक देखावा: स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी प्रतिष्ठानने यावर्षी महिला अत्याचारावर आधारित विशेष देखावा सादर केला आहे. . भव्य पदयात्रा: सायंकाळी ६ वाजता कसबा पेठेतील जुनी वेस येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. . पुढील कार्यक्रम: दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजता शाहिरी शंभूगर्जना या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *