.

जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबुतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या पालखी महामार्गांमुळे अध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे भाविकांसाठी सुलभ झाले आहे. डिसेंबरपर्यंत पालखी महामार्ग पूर्ण होईल. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी-भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. त्यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याचबरोबर टेंभुर्णी-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग (एन एच ५६१) करण्याची घोषणा त्यांनी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी गडकरी यांनी गुरुवारी केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, सध्या पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील. पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्ते कामाबाबत रेल्वे प्रशासनाकडून काही परवानग्या आलेल्या नाहीत. त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल.’
पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहिरीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या विहिरीची पाहणी गडकरी यांनी केली. त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. एका बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बसमधून पालखी मार्गाची पाहणी करीत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या बसच्या पाठीमाणे आमदार, खासदार, भाजप, सेनेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या वाहनांचा ताफा धावत होता. गडकरींच्या पाठीमागे ३० ते ४० वाहनांचा ताफा असल्याचे यावेळी दिसून आले. प्रतिनिधी | अक्कलकोट रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी १ लाख कोटीच्या निधीतून पुढील ३ वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करु, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अक्कलकोट येथे आयोजित जिल्ह्यातील सहा प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कर्नाटक राज्याचे नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, खासदार ज्योती वाघमारे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी १०२० कोटी, अहिल्यानगर- सोलापूर कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यासाठी १० हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील कामासाठी ४८ कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी ३५ कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत- चेन्नई महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलून टाकेल. विविध महामार्गांमुळे जिल्हा देशाच्या मध्यभागी येऊन देशाचा लॉजिस्टिक हब बनेल,’ असा विश्वासही व्यक्त केला. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, विरोधकांना शत्रू समजले जात असताना तुम्ही आम्हाला आपले मानता, ही मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे काम घेऊन येण्यास प्रेरणा मिळते. अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला उणीव आहे, तुम्ही मुख्यमंत्री असायला हवे होते. फ्लायओव्हरसाठी गावकऱ्यांचे म्हणणे विचारात घ्यावे, अशी विनंती केली. गडकरी म्हणाले की, माझी आई एकदा पंढरपूर, गाणगापूर दर्शनासाठी आली होती. त्यावेळी तिने तक्रार केली की रस्ते खूप खराब झाले आहेत. माझी पाठ खिळखिळी झाली आहे. तिच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि पालखी मार्गाचे काम हाती घेतले. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. .सुरत चेन्नई ग्रीन फील्ड कॉरिडॉरचा एक भाग म्हणून हे महामार्ग पूर्ण केले जातील. यामुळे ३९० किलोमीटर आणि सहा तासाच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. .अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचणे सुलभ होईल. .राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ हा एक भाग सोलापूरसाठी अतिरिक्त रिंग रोड म्हणून काम करेल. .सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. {हसापूर ते बद्दाड रस्त्यासाठी १५५२ कोटीचा निधी. {वागदरी – अक्कलकोट – तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण. रस्त्याची लांबी ४७.६६ किमी. प्रकल्पाचा खर्च ३५३ कोटी रुपये. {मोहोळ- बसवनगर- वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण रस्त्याची लांबी ८२ कि.मी. असून प्रकल्प खर्च ७५६ कोटी. {दुधनी येथे रेल्वे उड्डाण पूल बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.१५० ई च्या उर्वरित ४.१२२ कि.मी. रस्त्याचे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण. खर्च ९७ कोटी. {बोरी उमरगे येथे बोरी नदीवर ०.७५ किमी पुलाचे बांधकाम. खर्च २६ कोटी. {या सर्व प्रकल्पांची एकूण लांबी १७१ कि.मी. असून त्याचा एकूण खर्च २७८४ कोटी रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले. सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यांच्यासह बसने प्रवास केला. अक्कलकोटचा कार्यक्रम संपल्यानंतर गडकरी सोलापूरला मुक्कामी आले होेते. त्यापूर्वी त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतले. ४८ किलोमीटरच्या या मार्गासाठी ९५० कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याशिवाय पंढरपूर रिंगरोडचे १३ किमी काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाचा डीपीआर तयार आहे. तोंडले येथे दोन्ही पालख्या एकत्र येतात त्याठिकाणी फ्लाय ओव्हर करण्याची सूचना केल्याचेही ते म्हणाले.